Posts

Showing posts from August, 2017

चार शब्दांचा संच रेशमाचा.....

Image
                                        श्री.प्रविण.बी. साळुंखे               हल्लीच्या मॉडर्न युगात म्हणजे आधुनिकतेने भरलेल्या जगात व्हाट्सअँप, फेसबुक यासारखी अनेक लोकप्रिय माध्यमे म्हणजे आपण त्यांस आपल्या कुटुंबातील एक सदस्य याप्रमाणे ही समाजमाध्यमे वापरतो. कालच्या ओघात जुन्या सेवेचा वापरही कमी-कमी होऊ लागला.त्यात आपल्या भारतीय टपाल सेवेचे योगदान उल्लेखनीयअसूनही आपण त्यास विसरून चाललो आहे. एकेकाळी दुरदूरपर्यंत संदेश पोहचवण्यासाठी हिचाच आधार घेतला जायचा. पण ठीक आहे , काळाप्रमाणे आपणास आपली वेळ ही बदलायला हवी आणि आपण ती बदललीही..परंतु विसरून मात्र चालणार नाही.              आता कोणत्याही सण वार उत्सव जयंती वाढदिवस पुण्यतिथी आशा एक ना अनेक सणासाठी आपण शुभेच्छा देण्यासाठी डिजिटल समाजमाध्यमे वापरत असतो, आपली दिवसाची सुरुवातच सकाळच्या गुड मॉर्निंग मेसेज ने होते , तिकडे तो अंथरुणातून न उठताच इकडे दुसर्यांना शुभेच्छा देण्यास उतावळा असतो. इथं भावनांना प्राधान्य दिलं जात नाही, त्यामुळे आपल्याला कधी कधी या गोष्टींचा राग येतो. कोणत्याही संदेशाची पुरेपूर माहिती नसतानाही ती दुसर्यांना पाठवण्यास