Posts

अनंत..पत्रास कारण की...

Image
प्रिय अनंत... स.न.वि.वि.        खरं सांगू अनंत, तुला कित्येक दिवसांपासून पत्र लिहिण्याचा विचार मनात घोळत होता. आणि आज तो दिवस आला, तुझ्या वाढदिवसानिमित्त का होईना कधीतरी व्यक्त होण्याची संधी मिळाली, तुला माहितेय माझं वक्तृत्व इतकस चांगलं नाही. फोनवर तर आपलं बोलणं होतंच असत, पण सगळं डोक्यात होतं ते फक्त शब्दात आणायचं होतं. मग काय पत्र तयार. तू ही एकदा बोलला होतास मला पण पत्र खूप आवडतात, पण हल्ली ते बंदच झालेत. बरेच दिवस झालं मी पण कुणाला पत्र नाही पाठवलं. पूर्वी शाळेत होस्टेलला  असताना मी घरी पत्र पाठवायचो. खरं तर कुणाला पत्र लिहाव असे लोक फार कमी असतात. सगळ्याच गोष्टी शब्दात व्यक्त होतात च असं हि नाही. तरी हि हा पत्र प्रपंच. खूप काही गोष्टी सांगायच्या राहून गेल्यात. का अन कशामुळे बोललो नसेल कळल नाही कधी. म्हणून तुला पत्र लिहावं वाटलं. तरी हि मनात जे आहे ते बाहेर येतच नाही. ती माझी कमजोरी म्हणा कि अजून काही. कुणास ठाऊक, ते मला पण माहिती नाही ? आज जग जरी तंत्रज्ञानाने बदलले असले तरी मला आवडतो तो पत्र व्यवहार. मनातल्या गोष्टी कागदावर उतरवण्यात जी मजा आहे ती बोलण्यात नाही.  

"बायको"-नावाचं अदभूत रसायन

Image
              आपल्या या सुंदर पृथ्वी तलावर स्त्री शिवाय सारं काही अपूर्ण आहे कारण तिच्या असण्यानेच आज आपण आणि आपलं अस्तित्व आहे कारण तिनेच जन्म दिला आहे. स्त्री ही आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या नात्यानं येत असते या नात्याची सुंदर सुरुवात होते ती आईच्या भूमिकेतून. आई, बहीण, वहिनी, बायको, लेक अशी एक ना अनेक नात्यानं स्त्री जोडली जाते. आपल्या आयुष्यातील अशाच "बायको" या एका सुंदर नात्याचा प्रवास आणि तिची भूमिका आज लिहावंसं वाटली. आज कित्येक उदाहरणे देता येतील की स्त्री शक्तीच्या ताकदीवर आज यशाच्या शिखरावर आहेत. त्या ताकदीमध्ये बायको या नावाचा खूप मोलाचा वाटा असतो. हल्ली बायकोवर फार कमी बोललं जातं कारण बोललं तर 'बायल्या' नाही बोललं तर 'याला अक्कलच नाही' असे गुण आपल्याला आपल्या समाजाकडून मिळत असतात. (छायाचित्र- प्रातिनिधिक स्वरूपात इंटरनेटवरून)                                                 "बायको"- 'ती'ला समजून घेताना...               बायको म्हणजे आहे तरी कोण ? कुठली ती अनोळखी उनाड मुलगी आयुष्यात येते आणि आपलं आयुष्यचं बदलून टाकते. आपल्या

"तुलाही एक बहीण आहे"....

Image
  (भावा-बहिणीचं पवित्र नातं असतं अन म्हणूनच त्या नात्याचा आधार घेऊन सांगण्याचा प्रयत्न करतोय कारण जगातलं सर्वांत सुंदर नात या व्यतिरिक्त दुसरं कोणतं असेल अस मला वाटत नाही कारण इथं द्वेश, ईर्षा, भांडणामागे सुध्दा प्रेम लपलेले असतं अस हे सुंदर नात असत.आईनंतर जर जगात तुमच्यावर जीव टाकणारी कोणी व्यक्ती असेल तर ती म्हणजे बहीण...असं म्हणतात की देव सर्वत्र असू शकत नाही म्हणून त्याने आई निर्माण केली. आई फार काळ असू शकत नाही. म्हणून कदाचित त्याने आईला समर्थ पर्याय होऊ शकेल, तिच्याच पोटी अशी बहीण निर्माण केली. कुठल्याही परिस्थितीत ती पाठीशी उभी असते. गुणांचं तोंड भरून कौतुक करते. अवगुणांवर शिताफीने पांघरूण घालते. बाजू घेऊन भांडायला ती सदैव तत्पर असते. ‘माझा भाऊ’ अशी ओळख करून देताना तिचा चेहरा अभिमानाने फुललेला असतो. तिचं अख्खं माहेर त्या एका भावात एकवटलेलं असतं....! म्हणून याच नात्याच्या प्रवासातून पुढचा लिखाण प्रवास....) प्रिय तरुण भावास, स.न.वि.वि,            मी इकडं तुझ्या विचाराविषयी थोडीशी चिंतीत आहे, कारण विषय अनेक आहेत पण आज मी तुला मुद्दामहून एकाच विषयावर बोलणार आहे. तू आता तरुण

नागाच्या पिलाला तू का ग खवळल...!!!

Image
वाह ....काय उच्च विचार आहेत मा.मुख्यमंत्र्याचे... शेतकऱ्याचं मी पोर... नको तुझ्या जीवाला घोर... आम्हांस माहीत आहे तुमच्या फासाचा दोर... आहोत आम्ही स्वतः खंबीर....!!!                गाढवालासुद्धा ताप येण्यासारखे विचार मांडून आपल्या अतिउच्चकोटी बुद्धी कौशल्याचं प्रदर्शन पुन्हा एकदा केलंय....शेतकऱ्यांच्या मुलांनी वडिलोपार्जित शेतीत राबायचं अन तुमच्या सारख्या घुबडानी येऊन त्यांना लुटायचा, हाच उद्देश आहे तुमचा...पेशव्यांनी ज्या पद्धतीने सामान्य जनतेच्या पिळवणूक करून समाजातल्या दिन दुबळ्या लोकांना हीन वागणूक दिली, त्याच पद्धतीने तुम्ही सध्या आम्हाला वागणूक देण्याचा प्रयत्न करत आहेत...पडद्याआड तुमच्या कोणत्या भूमिका असतात ते आता समोरासमोर जनतेला दिसतंय, इंग्रजी राजवटीत जनता खुश होती अशी म्हणायची वेळ आली, पण हे आता शक्य नाही, कारण आम्ही सध्या जरी बेरोजगार असलो तरी तुमच्या सारखी बुद्धी गहाण ठेवून काम करत नाही....                मुख्यमंत्रीसाहेब, तुम्ही तर महाराष्ट्रचे पालक आहात, पालकांची आपल्या कुटूंबप्रती काय जबाबदारी असते ते सुद्धा माहीत नाही, जाऊ देत तुम्हाला तुमच्या घरची मंडळी सा

आयुष्याला द्यावे उत्तर...

Image
                आज नवीन वर्षीची सुरुवात, सर्वांनी नवीन वर्षात नवनवे संकल्प केले असतील, कुणी डायरी आणून दिनक्रम लिहिणे, सकाळी गणपतीच्या पाया पडून दिवसाची तयारी, जिम लावणे, इत्यादी. ३६५ दिवसाची संपूर्णपणे गोळाबेरीज केली असेल पण उद्याचं काय विचारलं तर समोर प्रश्नचिन्ह उभे राहत.एकएक दिवसांचा विचार करत वर्ष कधी सरून जात ते कळत सुध्दा नाही म्हणून आजचा दिवस कसा आनंदी घालवता येईल हाच फक्त विचार केला तर त्या दिवशी तुम्ही उत्तरदायी असाल. आयुष्य म्हणजे काय..? प्रत्येकाच्या वेगवेगळ्या संकल्पना विचार आहेत पण आयुष्य जगत असताना कोणत्या पद्धतीने जगावं हे मराठी कवी विंदा करंदीकर यांनी त्यांच्या कवितेच्या माध्यमातून अतिशय सुरेख पध्दतीने मांडले आहे, ती कविता मला खूप आवडली म्हणूनच आपल्या बरोबर ती शेअर करतोय. आपल्या आयुष्याच्या संकल्पनाची परिपूर्ती करण्यासाठी हे फारच गुणकारी औषध आहे असं मला वाटतं. आयुष्याच्या बुद्धीपटलावरती स्पर्धा ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे, स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आपण कोणत्या पद्धतीने आपल्या विचाराची निर्मिती करतो, कशाची भीती बाळगून आपले सामर्थ्य कमी करतो, इच्छा असते पण मार्ग म

बाबांन लेकी साठी लिहलेली कविता...

Image
एका बाबानं लेकीसाठी लिहिलेली कविता. बाबानेही वाचावी अन लेकीनेही! गोड माझी परी! देवाच्या घरून एव्हढ्या दुरून आली माझ्या घरी, गोड माझी परी हृदयाचे स्पंदन ती, रेशमाचे बंधन ती, प्रेमाची भाषा ती, जगण्याची आशा ती पाणावले डोळे आज, पापण्यांच्या तिरी आली माझ्या घरी गोड माझी परी... बोबल्या बोलांनी, निनादले घर पावलांच्या गुंत्यात, जीव खालीवर घोडा करून बाबाचा, स्वारी खूष पाठीवरी आली माझ्या घरी गोड माझी परी... शाळेत पहिला दिवस तिचा काळजीनं बाबाचा जीव वेडापिसा हुरहूर मनाला जरी , टाटा ती करी आली माझ्या घरी गोड माझी परी... ए बाबा तू कुठे आहेस? तू ये ना घरी लवकर अस तिचं फोनवरचं लाडिक मधाळ बोलणं, बाबाला घायाळ करी फोन करून ती घेई काळजाचा ठाव मग बाबाच्या मनाची होई धावाधाव आईपेक्षा बाबावर लळा ती करी आली माझ्या घरी गोड माझी परी... हळू हळू वाढे ही चंद्राची कोरं नटण्या मुरडण्याची हौस तिला भारी हट्ट पुरवे बाबा तिचा अपुल्या परी आली माझ्या घरी गोड माझी परी... हळू हळू दिवस गेले भुर्र उडून स्थळ आलं तिला कुणा आप्ताकडून काळजात झाल चर्र , पिल्लू जाईल आता दुसऱ्या घरी आली माझ्या

स्त्री जन्मा ही तुझी कहाणी....!!!!

Image
            " यत्र नार्यस्तु पुज्यते! रमन्ते तत्र देवता !"   अशी नारी पुजनाची महती संस्कृत सुभाषितकाराने गायिली आहे. या जगात फक्त दोनच जाती आहेत ती म्हणजे एक पुरुष, दुसरी स्त्री. नारीचे(स्त्री)  पूजनीय स्थान सांगत असताना 'न स्त्री स्वातंत्रमहर्ती...!! असे म्हणून तिच्या स्वातंत्र्याची किल्ली मात्र पुरुषांच्या हातांत देऊन टाकली आहे.                        "तुच माता तुच सरस्वती,                         तुच कालिका, तुच रणरागिणी,                         तुच या विश्वाची वसुंधरा,                         तुच सखी नि तुच दामिनी,                         तु इंदिरा, तू झाशी,                         तु जिजाऊ तु सावित्रीबाई,                        तु प्रतिमा, तु कल्पना,                        तु आदिशक्ती, तु संयमाचा महामेरू"               अशा एक ना अनेक प्रकारे स्त्रीची विविध रूप समोर येतात, आपण त्यास पाहतो; पण आज हे प्रत्येक स्त्रीला उपभोगता आलं का ? ती स्वतः तिचं रक्षण करण्याचे कार्य करू शकते का ? स्त्री वंदनीय आहे, पुज्यनिय आहे म्हणून ती रक्षणीय आहे. पण रक्ष