चार शब्दांचा संच रेशमाचा.....

                                        श्री.प्रविण.बी. साळुंखे

              हल्लीच्या मॉडर्न युगात म्हणजे आधुनिकतेने भरलेल्या जगात व्हाट्सअँप, फेसबुक यासारखी अनेक लोकप्रिय माध्यमे म्हणजे आपण त्यांस आपल्या कुटुंबातील एक सदस्य याप्रमाणे ही समाजमाध्यमे वापरतो. कालच्या ओघात जुन्या सेवेचा वापरही कमी-कमी होऊ लागला.त्यात आपल्या भारतीय टपाल सेवेचे योगदान उल्लेखनीयअसूनही आपण त्यास विसरून चाललो आहे. एकेकाळी दुरदूरपर्यंत संदेश पोहचवण्यासाठी हिचाच आधार घेतला जायचा. पण ठीक आहे , काळाप्रमाणे आपणास आपली वेळ ही बदलायला हवी आणि आपण ती बदललीही..परंतु विसरून मात्र चालणार नाही.
             आता कोणत्याही सण वार उत्सव जयंती वाढदिवस पुण्यतिथी आशा एक ना अनेक सणासाठी आपण शुभेच्छा देण्यासाठी डिजिटल समाजमाध्यमे वापरत असतो, आपली दिवसाची सुरुवातच सकाळच्या गुड मॉर्निंग मेसेज ने होते , तिकडे तो अंथरुणातून न उठताच इकडे दुसर्यांना शुभेच्छा देण्यास उतावळा असतो. इथं भावनांना प्राधान्य दिलं जात नाही, त्यामुळे आपल्याला कधी कधी या गोष्टींचा राग येतो. कोणत्याही संदेशाची पुरेपूर माहिती नसतानाही ती दुसर्यांना पाठवण्यासाठी उतावीळ असतो आणि याचे पुढचं परिणाम आपणास  माहीत आहेतच, मी कशाला सांगायला हवं.
          माझा अनुभव, मला कालच्या रक्षाबंधनाच्यादिवशी सर्वाना समाजमाध्यमातून शुभेच्छा संदेश डिजिटल राख्या मिळाल्या असतील, मला ही मिळाल्या. पण मला मात्र त्याहूनही(तुमच्यापेक्षा) जास्तीचा आनंद मिळाला, कारण माझ्या ताईने-माईने(बहिणी) यावर्षी राखी पाठवली, त्या पाकिटात दोघीकडून एक एक  पार्ले-किसमी चॉकलेट पाठवले. खूप आनंद वाटला. या चॉकलेट आणि त्या राखीच्या दोऱ्याची किमंत मोजली तर सगळे मिळून 15 रुपये होईल पण आनंद मात्र न मोजता येण्यासारखा आहे. आणखीन त्यात त्यांनी स्वलिखित एक शुभेच्छासंदेश पाठवला , प्रेमाच्या मायेच्या हाताने लिहलेला त्या शुभेच्छापत्राचा स्वीकार करण्यात वेगळीच मजा अनुभवली, कारण हल्ली कागदावर लिहून पाठवणं जवळपास बंदच झालंय. पण मला मात्र लिहून मिळालं. माझ्याकडून भारतीय टपाल सेवेचे मनपुर्वक धन्यवाद....
                 मित्रांनो माझा यापाठीमागे हाच उद्देश आहे की, वेळ काळ बदलला तरी काही जुन्या सेवांचा रूढी परंपरा(पर्यायाने येथे म्हणता येणार नाही मात्र संदर्भ लक्षात घ्या) वापर अवश्य करा. सध्या आपल्या अनेक सेवा धूळ खात पडल्या आहेत , त्यात टपाल सेवा आहे. शासनाने विविध सेवा योजना वितरित केल्या तरी आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. एके काळी आपला कुटुंबसद्स्य आपला आधार असणारी ही टपाल सेवेला आता आपल्याच आधाराची गरज आहे, हे आपण करू शकतो.
         माझं एकच सांगणं आहे, सर्व काही विसरा पण इतिहास मात्र विसरू नका कारण तो कधी पुसला जात नाही...

                                           श्री.पी.बी. साळुंखे



Comments

Popular posts from this blog

अनंत..पत्रास कारण की...

बाबांन लेकी साठी लिहलेली कविता...

स्त्री जन्मा ही तुझी कहाणी....!!!!