शिक्षणव्यवस्था ते शिक्षणमहर्षी...
लेखन- प्रविण बाजीराव साळुंखे कर्मवीर जयंती निमित्त ... आजच्या लेखाची सुरुवात गीतकार कवी विठ्ठल वाघ यांच्या रयतगीताने करावीशी वाटते याला कारणही तसेच आहे की आजची शिक्षण व्यवस्थेतील बदललेल्या वळणाची अवस्थेची गाथा याला यतकिंचितही स्पर्शून जात नाही याची जाणीव होते... रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोह नभाला पडतो आहे. || धृ || कर्मवीरांचे ज्ञान पीठ हे शक्तीपीठ हे ठरते आहे. शाहू-फुल्यांचे समानतेचे तत्व मानसी मुरते आहे. धर्म जातीच्या पार गांधींचे मूल्य मानवी जपतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे.|| १ || गरिबांसाठी लेणी मोडून , लक्ष्मी वाहिनी झाली आई. कमवा आणि शिका मंत्र हा तरुणाईला प्रेरक होई. स्वावलंबी वृत्ती ठेऊनि, ज्ञानसाधना करतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. || २|| दिन-दलितांसाठी आण्णा तुमची झिजली चंदन काया अनाथ जीवा सदा लाभली मातृ हृदयी तुमची माया. शून्या मधुनी नवसृष्टीचा निर्मिक त...