"बायको"-नावाचं अदभूत रसायन
आपल्या या सुंदर पृथ्वी तलावर स्त्री शिवाय सारं काही अपूर्ण आहे कारण तिच्या असण्यानेच आज आपण आणि आपलं अस्तित्व आहे कारण तिनेच जन्म दिला आहे. स्त्री ही आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या नात्यानं येत असते या नात्याची सुंदर सुरुवात होते ती आईच्या भूमिकेतून. आई, बहीण, वहिनी, बायको, लेक अशी एक ना अनेक नात्यानं स्त्री जोडली जाते. आपल्या आयुष्यातील अशाच "बायको" या एका सुंदर नात्याचा प्रवास आणि तिची भूमिका आज लिहावंसं वाटली. आज कित्येक उदाहरणे देता येतील की स्त्री शक्तीच्या ताकदीवर आज यशाच्या शिखरावर आहेत. त्या ताकदीमध्ये बायको या नावाचा खूप मोलाचा वाटा असतो. हल्ली बायकोवर फार कमी बोललं जातं कारण बोललं तर 'बायल्या' नाही बोललं तर 'याला अक्कलच नाही' असे गुण आपल्याला आपल्या समाजाकडून मिळत असतात. (छायाचित्र- प्रातिनिधिक स्वरूपात इंटरनेटवरून) "बायको"- 'ती'ला समजून घेताना... ...