Posts

Showing posts from August, 2018

अनंत..पत्रास कारण की...

Image
प्रिय अनंत... स.न.वि.वि.        खरं सांगू अनंत, तुला कित्येक दिवसांपासून पत्र लिहिण्याचा विचार मनात घोळत होता. आणि आज तो दिवस आला, तुझ्या वाढदिवसानिमित्त का होईना कधीतरी व्यक्त होण्याची संधी मिळाली, तुला माहितेय माझं वक्तृत्व इतकस चांगलं नाही. फोनवर तर आपलं बोलणं होतंच असत, पण सगळं डोक्यात होतं ते फक्त शब्दात आणायचं होतं. मग काय पत्र तयार. तू ही एकदा बोलला होतास मला पण पत्र खूप आवडतात, पण हल्ली ते बंदच झालेत. बरेच दिवस झालं मी पण कुणाला पत्र नाही पाठवलं. पूर्वी शाळेत होस्टेलला  असताना मी घरी पत्र पाठवायचो. खरं तर कुणाला पत्र लिहाव असे लोक फार कमी असतात. सगळ्याच गोष्टी शब्दात व्यक्त होतात च असं हि नाही. तरी हि हा पत्र प्रपंच. खूप काही गोष्टी सांगायच्या राहून गेल्यात. का अन कशामुळे बोललो नसेल कळल नाही कधी. म्हणून तुला पत्र लिहावं वाटलं. तरी हि मनात जे आहे ते बाहेर येतच नाही. ती माझी कमजोरी म्हणा कि अजून काही. कुणास ठाऊक, ते मला पण माहिती नाही ? आज जग जरी तंत्रज्ञानाने बदलले असले तरी मला आवडतो तो पत्र व्यवहार. मनातल्या गोष्टी कागदावर उतरवण...