नागाच्या पिलाला तू का ग खवळल...!!!
वाह ....काय उच्च विचार आहेत मा.मुख्यमंत्र्याचे... शेतकऱ्याचं मी पोर... नको तुझ्या जीवाला घोर... आम्हांस माहीत आहे तुमच्या फासाचा दोर... आहोत आम्ही स्वतः खंबीर....!!! गाढवालासुद्धा ताप येण्यासारखे विचार मांडून आपल्या अतिउच्चकोटी बुद्धी कौशल्याचं प्रदर्शन पुन्हा एकदा केलंय....शेतकऱ्यांच्या मुलांनी वडिलोपार्जित शेतीत राबायचं अन तुमच्या सारख्या घुबडानी येऊन त्यांना लुटायचा, हाच उद्देश आहे तुमचा...पेशव्यांनी ज्या पद्धतीने सामान्य जनतेच्या पिळवणूक करून समाजातल्या दिन दुबळ्या लोकांना हीन वागणूक दिली, त्याच पद्धतीने तुम्ही सध्या आम्हाला वागणूक देण्याचा प्रयत्न करत आहेत...पडद्याआड तुमच्या कोणत्या भूमिका असतात ते आता समोरासमोर जनतेला दिसतंय, इंग्रजी राजवटीत जनता खुश होती अशी म्हणायची वेळ आली, पण हे आता शक्य नाही, कारण आम्ही सध्या जरी बेरोजगार असलो तरी तुमच्या सारखी बुद्धी गहाण ठेवून काम करत नाही.... मुख्यमंत्रीसाहेब, तुम्ही तर महाराष्ट्रचे पालक आहात, पालकांची आपल्या कुटूंबप्रती...