नागाच्या पिलाला तू का ग खवळल...!!!
वाह ....काय उच्च विचार आहेत मा.मुख्यमंत्र्याचे...
शेतकऱ्याचं मी पोर...
नको तुझ्या जीवाला घोर...
आम्हांस माहीत आहे तुमच्या फासाचा दोर...
आहोत आम्ही स्वतः खंबीर....!!!
गाढवालासुद्धा ताप येण्यासारखे विचार मांडून आपल्या अतिउच्चकोटी बुद्धी कौशल्याचं प्रदर्शन पुन्हा एकदा केलंय....शेतकऱ्यांच्या मुलांनी वडिलोपार्जित शेतीत राबायचं अन तुमच्या सारख्या घुबडानी येऊन त्यांना लुटायचा, हाच उद्देश आहे तुमचा...पेशव्यांनी ज्या पद्धतीने सामान्य जनतेच्या पिळवणूक करून समाजातल्या दिन दुबळ्या लोकांना हीन वागणूक दिली, त्याच पद्धतीने तुम्ही सध्या आम्हाला वागणूक देण्याचा प्रयत्न करत आहेत...पडद्याआड तुमच्या कोणत्या भूमिका असतात ते आता समोरासमोर जनतेला दिसतंय, इंग्रजी राजवटीत जनता खुश होती अशी म्हणायची वेळ आली, पण हे आता शक्य नाही, कारण आम्ही सध्या जरी बेरोजगार असलो तरी तुमच्या सारखी बुद्धी गहाण ठेवून काम करत नाही....
मुख्यमंत्रीसाहेब, तुम्ही तर महाराष्ट्रचे पालक आहात, पालकांची आपल्या कुटूंबप्रती काय जबाबदारी असते ते सुद्धा माहीत नाही, जाऊ देत तुम्हाला तुमच्या घरची मंडळी सांभाळता येत नाहीत अन महाराष्ट्रच काय घेऊन बसलात...शेतकऱ्यांच पोर कलेक्टर झालं तर तुमच्या पोटात का दुखतंय...कायमच शेणामातीला चिटकून राहण्याचा त्यांना हा कोणता शाप तुम्ही देताय...शेणामातीचा सुगंध तुम्हाला त्या फुकटच्या एसीमध्ये बसून काय कळणार...!!! अशे तुमच्या सारखे किती आले किती गेले आणि किती कोलले याचा हिशोब आम्ही ठेवला नाही..थांबा थोडं ...तुमची काय अवस्था होतेय ते थोड्याच दिवसांत कळेल...!!!!
मुख्यमंत्रीसाहेब, तुमचे सुद्धा पालक शेतकरीच होते ना ..??? मग कशाला घेतला मुख्यमंत्री पद...!!! करायची ना शेतीच..."ज्ञान सांगी लोकाला,शेंबूड आपल्या नाकाला". उगीचच काहीपण मनात येईल ते बरळू नका..आमचा तुमच्या म्हणण्यापेक्षा (पदा)प्रती आदर आहे....कशाला आपल्या ज्ञानाचा दिवा आमच्या प्रती पाजळताय....आम्ही तुम्हाला ठासून सांगतो , माझ्या शेतकरी राजाचं पोर नोकरी करणार, ती नोकरी मिळवण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करणार, वाटेल ते आव्हान पेलण्यास आमचे शेतकरी पालक सदैव तत्पर राहणार..तहानलेल्या या शेतकरी राजाला निसर्गाच्या पुढे कधी झुकला नाही तर "तूम किस झाड की पत्ती, तुम क्या चीज हो" ......
माझ्या शेतकरी राजाचं पोरगं दिवसभर एसीमध्ये नोकरी करणार पण तुमच्यासारखं या माझ्या काळ्या मातीचं इमान नाही तोडणार, तिच्या कुशीवर नतमस्तक होऊनच काम करणार....टरबूज्या..!!! माझ्या गरीब शेतकरी राजाचं पोरगं देशाच्या सीमेवर रात्रीचा दिवस करून हिमालयाच्या थंडीत, राजस्थानच्या वाळवंटात, आसामच्या दरीखोऱ्यात, एवढंच काय तर ते अरबी,बंगालच्या समुद्रास सुद्धा समर्थपणे आव्हान देत उभा आहे, इकडं आईबापांना, पोटच्या लेकरांना सोडुन काळजावर दगड ठेऊन तुमचं आमचं संरक्षण करतोय म्हणून तर आपण इकडं निवांतपणे राहतोय, इकडं नोकरीसाठी तुम्हा कुण्या राजकारण्यांचा हिरालाल(पुत्र) गेला असेल तर दाखवून द्या(मानस असला तरी चालेल कारण तुम्हाला घरी जायला वेळ नसतो ना, असल्या वायफळ बडबडीतून वेळ तरी मिळायला हवा) त्याला आम्ही शेतकरी पोर शेतकरीवर्गणीतून २१ तोफांची सलामी देतो......
मुख्यमंत्रीसाहेब, आम्हा शेतकरी राजाच्या पोरांना तरी सल्ला देऊ नका, कारण त्यांची प्रतिक्रिया खूप वाईट असते. मान्य आहे तुम्ही आमच्या महाराष्ट्रचे पालक आहात पण कस आहे, माणूस हा चुकीचा पुतळा आहे ,पण एकदा केलेली चूक पुन्हा करत नाही. शेतकऱ्यापोटी थोडातरी आदर ठेवा, नाहीतर जनता माफ नही करेगी..!!! गेली तीन वर्षे झाली आपणांस सत्तेवर येऊन, दिलेली आश्वासन तर तुम्ही पुरतीच विसरून गेलात पण आपण अशी वाचाळवीरता, आणि जातीयवाद, चंगळवादी संस्कृतीचे बीजारोपण खूपच चांगल्या पद्धतीने केले आहे. गेली कित्येक वर्षांपासून आपण नोकरीत घट करून खाजगीकरण करण्यात आपणास स्वारस्य वाटू लागलं आहे, नोकरभरती कमी केलीत,शेतकरी आत्महत्या, वाढती गुन्हेगारी आदीवर कोणत्याही प्रकारच नियंत्रण नियोजन नाही, ब्रिटिशसरकारने ज्याप्रकारे राज्य चालवलं त्याचं अनुकरण आपण करत निघालात, सगळं काही कंपनीकायदाप्रमाणे....असं आपलं सांगण्यासारखं बरंच काही आहे. अन तुम्हाला कशाला हवीय पेन्शन, तुमच्या साठी राज्यसरकारच्या तिजोरीत मुबलक ठेव आहे, आहो मेलेल्या मड्याच्या सरणावरच लोणी सुद्धा आता तुम्हाला कमी पडू लागलंय, तर तुम्हाला या एक वेळेच्या जेवणाची चिंता असणाऱ्या शेतकरी राजाचं काय पडलंय म्हणा...!!!! ही तर सर्वस्वी आमचीच चुकी आहे, ही चुकी मान्य करतोय हे पण आमचे एवढे मोठेपण...!!!
मुख्यमंत्रीसाहेब, आता वेळ आलीय आणि ती वेळ आपणच आणून दिलीय..."कल्लुळाच पाणी का ग ढवळल...नागाच्या पिलाला तू का ग खवळल...!!! आता तुम्ही या नागाच्या मानेवरच पाय दिलाय हे नागाच पिल्लू खवळलेल्या अवस्थेत आहे....विचार करा....!!!! आणि आमच्याप्रती कोणत्या विचारांची देवाणघेवाण असावी हे आपणास समजायला हवं, आम्ही काय करावे , काय करू नये हे आपल्या घरात सांगावे (बँक सोडून बॉलिवूडचीच जास्त गाणी वाजत असतील घरात), आम्हास नको...सल्ले देण्यापेक्षा आपण समस्येवर(नोकरभरती, शिक्षणसेवक,अंगणवाडी,शेतकरीआत्महत्या,पुरोगामी विचारांची हत्या इत्यादी) विचार करून उपाययोजना कराव्यात..!!!(इथं आम्ही आपणांस सल्ला देतो कारण आमचा तो तुमच्या पदाप्रति अधिकार आहे)..आणि बाकी काय सल्ला देणारे आम्हांस आहेत, तुम्हा कडव्याची गरज वाटत नाही.
सरतेशेवटी जाताजाता मुख्यमंत्रीसाहेब तुमच्यासाठी लक्षवेधी सूचना....
मी शेतकऱ्याच पोर....
शिकवलंय माझ्या बापानं...
राख इमान या मातीचा...
फोड पाझर तुझ्या घामाचा...
देऊन टाक हिसका या शेतकऱ्याच्या जातीचा....
आणि दाखवून दे क्षण तुझ्या अस्तित्वाचा.........!!!!
"मला आहे सत्तेचा माज(मुख्यमंत्री)
मला आहे शेतीचा माज(शेतकरी)"
धन्यवाद.......
लेखन- श्री.प्रविण बाजीराव साळुंखे.
नारायण पेठ, पुणे.
Khup chan bhai...
ReplyDelete