बाबांन लेकी साठी लिहलेली कविता...
एका बाबानं लेकीसाठी लिहिलेली कविता. बाबानेही वाचावी अन लेकीनेही! गोड माझी परी! देवाच्या घरून एव्हढ्या दुरून आली माझ्या घरी, गोड माझी परी हृदयाचे स्पंदन ती, रेशमाचे बंधन ती, प्रेमाची भाषा ती, जगण्याची आशा ती पाणावले डोळे आज, पापण्यांच्या तिरी आली माझ्या घरी गोड माझी परी... बोबल्या बोलांनी, निनादले घर पावलांच्या गुंत्यात, जीव खालीवर घोडा करून बाबाचा, स्वारी खूष पाठीवरी आली माझ्या घरी गोड माझी परी... शाळेत पहिला दिवस तिचा काळजीनं बाबाचा जीव वेडापिसा हुरहूर मनाला जरी , टाटा ती करी आली माझ्या घरी गोड माझी परी... ए बाबा तू कुठे आहेस? तू ये ना घरी लवकर अस तिचं फोनवरचं लाडिक मधाळ बोलणं, बाबाला घायाळ करी फोन करून ती घेई काळजाचा ठाव मग बाबाच्या मनाची होई धावाधाव आईपेक्षा बाबावर लळा ती करी आली माझ्या घरी गोड माझी परी... हळू हळू वाढे ही चंद्राची कोरं नटण्या मुरडण्याची हौस तिला भारी हट्ट पुरवे बाबा तिचा अपुल्या परी आली माझ्या घरी गोड माझी परी... हळू हळू दिवस गेले भुर्र उडून स्थळ आलं तिला कुणा आप्ताकडून काळजात झाल चर्र , पिल्लू जाईल आता दुसऱ्या घरी आली माझ्या...