बाबांन लेकी साठी लिहलेली कविता...

एका बाबानं लेकीसाठी लिहिलेली कविता. बाबानेही वाचावी अन लेकीनेही!


गोड माझी परी!
देवाच्या घरून एव्हढ्या दुरून
आली माझ्या घरी, गोड माझी परी

हृदयाचे स्पंदन ती, रेशमाचे बंधन ती,
प्रेमाची भाषा ती, जगण्याची आशा ती
पाणावले डोळे आज, पापण्यांच्या तिरी
आली माझ्या घरी गोड माझी परी...

बोबल्या बोलांनी, निनादले घर
पावलांच्या गुंत्यात, जीव खालीवर
घोडा करून बाबाचा, स्वारी खूष पाठीवरी
आली माझ्या घरी गोड माझी परी...

शाळेत पहिला दिवस तिचा
काळजीनं बाबाचा जीव वेडापिसा
हुरहूर मनाला जरी , टाटा ती करी
आली माझ्या घरी गोड माझी परी...

ए बाबा तू कुठे आहेस?
तू ये ना घरी लवकर
अस तिचं फोनवरचं लाडिक मधाळ बोलणं,
बाबाला घायाळ करी
फोन करून ती घेई काळजाचा ठाव
मग बाबाच्या मनाची होई धावाधाव
आईपेक्षा बाबावर लळा ती करी
आली माझ्या घरी गोड माझी परी...

हळू हळू वाढे ही चंद्राची कोरं
नटण्या मुरडण्याची हौस तिला भारी
हट्ट पुरवे बाबा तिचा अपुल्या परी
आली माझ्या घरी गोड माझी परी...

हळू हळू दिवस गेले भुर्र उडून
स्थळ आलं तिला कुणा आप्ताकडून
काळजात झाल चर्र , पिल्लू
जाईल आता दुसऱ्या घरी
आली माझ्या घरी गोड माझी परी...

लेक म्हणजे शेवटी दुसऱ्या घरचं लेणं
शिकायला हवं आता तिच्याविना जिणं
सुखरूप लाव देवा तिची नावं पैलतीरी
आली माझ्या घरी गोड माझी परी...

लेक सासरी निघून गेली तरी परी बाबाच्या हृदयात कायम आहे.
बाबा म्हणतो...
राहशील सदा परी तू माझ्या परीकथेत
येईल ओल पापण्यांना तुला बाबाच्या या व्यथेत

तुझ्या गुंतल्या जगात घेशील का उसंत जराशी
बाबाच्या आठवणी तू कवटाळशील का उराशी
राज्य तुझे असेल सदा माझ्या हृदयावरी
गेलीस सासरी जरी तू रहाशील सदा अंतरी

आली माझ्या घरी गोड माझी परी...

मुलगी आणि एक बाप यांचं नात कस असत हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यावर बरंच काही लिहता येईल मूळ कवीच्या परवानगी शिवाय ते करू शकत नाही.

मला माहित नाही कुणी लिहिली आहे, माझ्याकडे पण निनावी आली होती, मला आवडली म्हणून मी आपल्या समोर ठेवतोय, कोणी लिहिली आहे हे माहिती असती तर जरुर त्याची परवानगी घेतली असती. माहीत नाही कवी कोण आहे त्याच्या परवानगी शिवाय मी इथं पोस्ट करतोय. कवी पर्यंत पोचली असेल तर माफ कर याच संपूर्ण श्रेय फक्त तुलाच आहे. तुझं लेखन अजून वाचकांपर्यंत पोहचावे म्हणून मी माझ्या ब्लॉगवर पोस्ट करतोय.- श्री.प्रविण साळुंखे

Comments

Popular posts from this blog

"तुलाही एक बहीण आहे"....

"बायको"-नावाचं अदभूत रसायन

स्त्री जन्मा ही तुझी कहाणी....!!!!